बांदा (प्रतिनिधी) : व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूल, मडुरा येथील शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य कैलासवासी सतीश कामत यांचे दिनांक ८ ऑगस्ट २०२६ रोजी दुःखद निधन झाले.
त्यांच्या निधनाने शाळा परिवारावर शोककळा पसरली. त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी शाळेत श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून कैलासवासी सतीश कामत यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
यावेळी त्यांच्या कार्याची व शाळेसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची आठवण करून देण्यात आली. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो व त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना करण्यात आली.












