कणकवलीत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे वराह जयंती उत्साहात साजरी

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली येथे विविध हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एकत्र येत वराह पूजनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. हिंदुत्ववादी कार्यकर्ते नंदू आरोलकर आणि भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी भगवान वराह यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रतिमेस वंदन केले.

याप्रसंगी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना श्रीकृष्ण उर्फ राजू परब म्हणाले की वराह जयंती हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र सण असून, तो भगवान विष्णूंचा तिसरा अवतार असलेल्या ‘भगवान वराह’ यांच्या प्रकट दिनाप्रीत्यर्थ साजरा केला जातो. हा सण दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला (गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी) साजरा केला जात असून आमचे हिंदुत्ववादी नामदार नितेश राणे यांनी आजच वराह जयंती निमित्त हिंदू बांधवांना शुभेच्छा दिला त्यातून प्रेरणा घेत जिल्हाभरातील हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येत सर्वच्या सर्व तालुक्यांमध्ये वराह जयंतीचे कार्यक्रम करण्यात आले असून कणकवलीतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, सनातन संस्था, विश्व हिंदू परिषद ,भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा या सर्वांनी एकत्र येत हा कार्यक्रम आयोजित केला आणि भगवान वराह यांचे पूजन करून आशीर्वाद घेतले.

भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री या प्रसंगी बोलताना म्हणाले की पुढे कणकवलीत झालेल्या कार्यक्रमाच्या प्रेरणेतून गावोगावी भगवान वराह यांच्या जयंतीचा कार्यक्रम निश्चितपणे करण्यात येईल असा मानस त्यांनी व्यक्त केला . याप्रसंगी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री आपल्या बहुसंख्य युवां सोबत भगवान वराह यांचे पूजन करण्यासाठी उपस्थित होते. संदीप मेस्त्री यांनी निवेदन करताना सांगितले की ज्याप्रमाणे वराह देवाने पृथ्वीला संकटातून वाचवले, म्हणजेच त्यांनी आपल्याला आपल्या धरणीमातेचे आणि निसर्गाचे रक्षण करण्याचे महत्त्व शिकवले. आज आपण प्रगतीच्या नावाखाली आपल्या पृथ्वीचे नुकसान करत आहोत, प्रदूषण वाढवत आहोत. अशा वेळी वराह जयंती साजरी करत असताना, आपण सर्वांनी आपल्या पृथ्वीचे, झाडांचे आणि पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संकल्प केला पाहिजे.

याप्रसंगी भाजप तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण ऊर्फ राजू परब, सनातन संस्थेचे भाऊ सामंत आणि दिनेश जगम तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नंदू आरोलकर, सोशल मीडियाचे जिल्हा प्रभारी समीर प्रभूगांवकर यांच्यासोबत नगरसेविका मेघा गांगण, उपसरपंच पप्पू यादव, शक्ती केंद्रप्रमुख सदानंद चव्हाण, राजू चव्हाण, प्रशांत राणे, सुभाष मालंडकर, सदा चव्हाण, दीपक दळवी, सरपंच सचिन पारधीये, जयवंत गावकर, सिद्धार्थ जाधव, सुंदर जाधव अजित तांबे विघ्नेश गोखले आणि अन्य हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते

error: Content is protected !!