वैश्यवाणी समाजाला OBC प्रमाणपत्राचा मार्ग सुकर झाल्याबद्दल कृतज्ञता; समाजबांधवांचा उत्स्फूर्त सहभाग
कासार्डे (प्रतिनिधी) : वैश्यवाणी समाजातील पात्र घटकांना OBC प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग सुकर करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आमदार प्रमोद जठार यांचा OBC बांधवांच्या वतीने कासार्डे येथे नागरी सत्कार करण्यात आला. वैश्यवाणी समाजातील काही विशेष घटकांना OBC प्रमाणपत्र मिळावे, यासाठी आमदार प्रमोद जठार यांनी आमदार झाल्यानंतर पहिल्याच पावसाळी अधिवेशनात हा प्रश्न सभागृहात मांडला होता. त्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला यश मिळत महायुती सरकारच्या माध्यमातून संबंधित अडचणी दूर करण्यासाठी परिपत्रक काढण्यात आल्याने समाजातील पात्र नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या पार्श्वभूमीवर अभिषेक मंगल कार्यालय, कासार्डे येथे OBC बांधवांच्या वतीने आमदार प्रमोद जठार यांचा कृतज्ञतापूर्वक नागरी सत्कार करण्यात आला. तसेच हिंदू वैश्य, हिंदू वाणी आणि हिंदू वैश्य वाणी या समाजघटकांबाबत सकारात्मक भूमिका घेत राज्याचे OBC मंत्री अतुल सावे यांनी विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्याबद्दलही यावेळी महायुती सरकारचे आभार मानण्यात आले. या निर्णयामुळे पात्र वैश्यवाणी समाजबांधवांना OBC प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग अधिक सुकर झाला आहे.
यावेळी आमदार प्रमोद जठार यांनी समाजाच्या प्रश्नासाठी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याबद्दल समाजबांधवांनी त्यांचे आभार व्यक्त केले. समाजाच्या हक्कासाठी सातत्याने आवाज उठवून शासनदरबारी पाठपुरावा करण्याची भूमिका यापुढेही कायम राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाला बुवा संतोष कानडे, संतोष पारकर, बाळा जठार, प्राची ईसवलकर, सुधीर नकाशे, सुनील खाडये, चंद्रकांत जठार, नेहा दीपक माईणकर, विकास पाडगांवकर, सुनील तुकाराम वामणे, महेंद्र चंद्रनाथ सावंत, बाजीराव जनार्दन घोरपडे, रमेश प्रभाकर जामचे, सुरेश नारायण पाटणकर, श्रीकृष्ण कोकाटे, विलास पाटणकर, संतोष माळिणकर, उदय सावंत, नितीन निळकंठ, माणिकराव सराफ, प्रमोद पाटणकर, ओंकार साठे, अनिल घाडी, संजय घाडी, प्रदीप नाईक यांच्यासह अनेक समाजबांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन संजय विठ्ठल नकासे व दिगंबर ऊर्फ बंड्या मांजरेकर यांच्या वतीने करण्यात आले.












