कणकवली (प्रतिनिधी) : शिवडाव माध्यमिक विद्यालय शिवडाव या प्रशालेत कै. महादेव सिताराम सावंत ( उर्फ आप्पा डोंगरे ) स्मृतीप्रित्यर्थ सावंत फाऊंडेशन , कळसुली यांच्या वतीने आयोजित मुर्ती बनविण्याची स्पर्धा मोठया उत्साहात दि. 08 सप्टेंबर,2026 रोजी संपन्न झाली, सावंत फाऊंडेशनचे श्रीकृष्ण सावंत , प्रशालेचे मुख्याध्यापक मुकेश पवार या प्रसंगी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व आपला प्राचीन वारसा टिकविण्यासाठी सावंत फाऊंडेशन ने सलग 5 व्या वर्षी हा उपक्रम आयोजित केला होता. इ. 5 वी ते 7 वी व इ. 8 वी ते 10 वी या दोन गटात एकूण 30 विद्यार्थी या उपक्रमांत सहभागी झाले होते. सावंत फाऊंडेशनचे विश्वस्त श्रीकृष्ण सावंत यांनी या स्पर्धेच्यावेळी प्रशालेला भेट देऊन सर्व स्पर्धकांचा उत्साह वाढवला व या उपक्रमाविषयी मते जाणून घेतली, या मूर्ती बनविणे स्पर्धेचे परीक्षण प्रशालेच्या शालेय समितीच्या अध्यक्षा भाग्यरेखा दळवी व खजिनदार कृष्णा गांवकर यांनी केले.
गटवार प्रथम तीन क्रमांक
इ. 5 वी ते 7 वी प्रथम – कु.निहार विठोबा गावकर
द्वितीय – कु.साहिल सुनिल गोसावी
तृतीय – कु. श्रीतेज दिपक गावकर
इ. 8 वी ते 10 वी प्रथम – कु.हर्ष सुहास गोसावी
द्वितीय – कु.अनिरुध्द विश्राम केणी
द्वितीय – कु. आदित्य दिपक कोरगांवकर
तृतीय – कु.तन्मय संतोष सदडेकर
सर्व यशस्वी विजेत्यांचे व स्पर्धकांचे शिवडाव सेवा संघ, मुंबईचे अध्यक्ष मोहन पाताडे, कार्यवाह काशिराम गांवकर व इतर सदस्य , शालेय समितीच्या अध्यक्षा भाग्यरेखा दळवी, खजिनदार कृष्णा गांवकर, सदस्य गणेश म्हसकर, सदस्य विजय सावंत , प्रशालेचे मुख्याध्यापक मुकेश पवार व शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले आणि या अभिनव उपक्रमांसाठी सावंत फाऊंडेशनचे आभार मानले आहेत. सर्व विजेत्यांचा सावंत फाऊंडेशनच्या वतीने रोख बक्षिसे देऊन गौरव करण्यात येणार आहे.











