मुख्याध्यापिका दक्षता गोसावी मॅडम यांचा सेवानिवृत्तीप्रित्यर्थ सत्कार
आचरा (प्रतिनिधी) : सेवा सप्ताहा निमित्त वायंगणी घाडीवाडी जि. प. शाळा येथे आयोजित कार्यक्रमात शालेय विद्यार्थी व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना भारतीय जनता पार्टी मालवणच्यावतीने शालेय साहित्य तसेच खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
या कार्यक्रमाला भाजप किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश सावंत, तालुकाध्यक्षा ॲड. समृद्धी आसोलकर, ओबीसी सेल अध्यक्षा पूजा वेरळकर, ग्रामपंचायत सदस्या मालती जोशी, भाजप आचरा शक्ती केंद्र केंद्रप्रमुख बाळू वस्त, तसेच कार्यकर्ते संजय सावंत, भाई सावंत, घाडी आदी उपस्थित होते.
यावेळी तसेच मुख्याध्यापिका दक्षता गोसावी मॅडम यांच्या सेवानिवृत्तीप्रित्यर्थ त्यांना शुभेच्छा देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी गोसावी मॅडम यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. त्यानंतर कार्यक्रमाचा उत्साहपूर्ण वातावरणात समारोप करण्यात आला.











