कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कणकवली तालुका शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नवरात्रोत्सवाला आमदार प्रमोद जठार यांनी पत्नी नीरजा जठार यांच्यासह उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी उपस्थितांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
आमदार प्रमोद जठार यांच्या या भेटीदरम्यान शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.












