चिंदर येथे ‘माझा गाव आरोग्य संपन्न गाव’ आणि ‘टीबी मुक्त भारत’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

रक्तदान शिबिरात ६ महिला रक्तदात्यांन सह २० रक्तदात्यांनी केले रक्ताचे पुण्यदान, १४६ जणांची एक्स-रे तपासणी

आचरा (प्रतिनिधी) : क्षयरोगमुक्त गावाची संकल्पना साकारण्यासोबतच गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, या सामाजिक बांधिलकीतून चिंदर येथे आरोग्य तपासणी आणि रक्तदानाचा उपक्रम उत्साहात पार पडला. आयुष्मान आरोग्य मंदिर, चिंदर यांच्या वतीने ‘माझा गाव आरोग्य संपन्न गाव’ आणि ‘टीबी मुक्त भारत’ अभियानांतर्गत मंगळवार, १३ ऑक्टोबर २०२६ रोजी चिंदर आरोग्य उपकेंद्रात मोफत छातीचा एक्स-रे तपासणी कॅम्प आयोजित करण्यात आला. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शिबिराचे उद्घाटन जि. प. सदस्य सौ वर्षा सांबारी, पं. स. सदस्य दिपक सुर्वे, ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्गचे संस्थापक दयानंद गवस, बाबली गवंडे, आचरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. जुवेरीया मुजावर व डॉ. संकेत मेहरकर, निवृत्त सिबीआय अधिकारी सुरेंद्र उर्फ अन्ना सकपाळ यांच्या हस्ते
दीपप्रज्वलनाने व छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या आरोग्य तपासणी शिबिरात एकूण १४६ लाभार्थ्यांची छातीची एक्स-रे तपासणी करण्यात आली. यामध्ये ६० पुरुष आणि ८६ महिलांचा समावेश होता. क्षयरोगासह छातीशी संबंधित आजारांचे वेळीच निदान व्हावे, या उद्देशाने नागरिकांना मोफत तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.

दरम्यान, ‘सेवा संकल्प सेतू’ अभियानांतर्गत ग्रामपंचायत चिंदर येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आयुष्मान आरोग्य मंदिर, चिंदर, ग्रामपंचायत चिंदर आणि ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. या शिबिरात सहा महिलांसह एकूण २० रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. आचरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. जुवारीया मुजावर आणि पंचायत समिती सदस्य दीपक सुर्वे यांच्यासह रक्तदात्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. लोकप्रतिनिधी आणि आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी रक्तदानासाठी पुढाकार घेतल्याने उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

यावेळी भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्गचे संस्थेचे बाबली गवंडे, चिंदर आरोग्य उपकेंद्राचे अधिकारी डॉ. विवेक घाटगे, टेलिमेडिसिन मयुरी ठाकूर, हेमंत सावजी, उन्मेष करंदीकर, पूणम पालव, माजी सभापती हिमाली अमरे, रोहित तांबे आदी मान्यवर उपस्थित होते.

गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध करून देणे आणि समाजात रक्तदानाविषयी जनजागृती करणे, हा रक्तदान शिबिराचा प्रमुख उद्देश होता. मोफत एक्स-रे तपासणीला मिळालेला प्रतिसाद आणि रक्तदानासाठी पुढे आलेले रक्तदाते यांमुळे चिंदरमध्ये आरोग्य जनजागृतीसोबतच सामाजिक सेवेचा आदर्श निर्माण झाला.

या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी आरोग्य सेवक संतोष सावंत, संदीप परब, विनिता मसुरकर, सुनंदा अपराज, नंदिनी पावसकर, अश्विनी पाताडे, सरीता जंगले, अमृता तोरसोळकर, सागर अपराज, संतोष अपराज, नारायण चिंदरकर, विश्राम माळगांवकर, सिद्धेश नाटेकर, मनवा चिंदरकर, निशिगंध वझे, ग्रामपंचायत कर्मचारी आणि संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार डॉ. विवेक घाटगे यांनी मानले.

error: Content is protected !!