खारेपाटण (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ येथे श्री देवी शारदोस्तव कार्यंक्रम शनिवार दि.१७ ऑक्टोबर २०२६ रोजी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंगेश ब्रम्हदंडे यांच्या अध्यक्षतेखाली उस्ताहात व आनंदी वातावरणात संपन्न झाला.
यावेळी जि.प.केंद्र शाळा खारेपाटण नं.१ शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष संध्या पोरे,माजी अध्यक्ष संतोष पाटणकर, प्राप्ती कट्टी व्यवस्थापन समितीचे सदस्य व पालक यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सहाय्याने प्रशालेत शारदोस्तव कार्यक्रमाचे सुंदर आयोजन केले होते. यावेळी शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध फनी गेम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.तर विद्यार्थ्यांनी सामूहिक गरबा नृत्य करून कार्यक्रमाची शोभा वाढविली.
या कार्यक्रमाला जि. प सदस्य प्राची ईसवलकर, पं. स. सदस्य गुरुप्रसाद शिंदे, खारेपाटण सरपंच महेंद्र गुरव, खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, श्री देव कालभैरव दुर्गादेवी मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष मधुकर गुरव, खारेपाटण सोसायटी चे संचालक विजय देसाई, खारेपाटण गाव तंटामुक्ती समिती चे अध्यक्ष सुहास राऊत, जि. प केंद्र शाळा खारेपाटण नं.१ चे सेवानिवृत्त उच्च श्रेणी माजी मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर, केंद्रप्रमुख सचिन जायभाय खारेपाटण ग्रा. पं. सदस्य किरण कर्ले, अस्ताली पवार, सिटीजा धुमाळे आदी मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
या शारदोस्तव कार्यक्रमा निमित्त शाळेत श्री देवी शारदा मातेची प्रतिष्ठापना करण्यात येऊन तिचे पूजन करण्यात आले. यावेळी सामूहिक आरती करण्यात आली. यामध्ये शाळेच्या सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी सहभाग घेतला. खारेपाटण केंद्र शाळेच्या मुख्याद्यापिका आरती जोजन यांचे वतीने मान्यवर ग्रामस्थांचे स्वागत करण्यात आले.
हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे पदवीधर शिक्षक मिलिंद सरकटे, शीतल राठोड, सहाय्यक शिक्षिका दीपिका चव्हाण, समीक्षा राऊत, शंकरदास मॅडम, अबिदा काझी मॅडम व शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.












