साळीस्ते बौद्धवाडी येथे ग्रामस्थांच्या वतीने बांधण्यात आला बंधारा

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुकतील साळीस्ते गावातील बौद्धवाडी बांधवांच्या वतीने येथील मुख्य रस्ता साकव नजीक नळयोजना विहीर येथील वहाळ जवळ नुकताच श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य मंगेश कांबळे, ग्रामस्थ दिलीप कांबळे, विलास कांबळे, हरी कांबळे, माजी सरपंच मैथिली कांबळे, दीपिका कांबळे, राधाबाई कांबळे, करण कांबळे, चेतन कांबळे, हृतिकेत कांबळे, दर्शन कांबळे, आर्यन कांबळे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!