खारेपाटण ज्युनिअर कॉलेजचा ९८.२८ % निकाल

कॉमर्स शाखेची कु.सानिका कुलकर्णी ८६.६६ % गुण मिळवून कॉलेज मध्ये प्रथम

सायन्स,आर्ट्स व अकौ.अँड एडिटिंग विभागाचा १००% निकाल

खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रू. २०२३ च्या १२ वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. असून यामध्ये खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचलित कै.प्रभाकर लक्ष्मण पाटील आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स ज्युनिअर कॉलेज चा ९८.२८ % निकाल लागला असून कॉमर्स शाखेची विद्यार्थिनी कुमारी सानिका कुलकर्णी हिने ८६.६६ % गुण मिळवत कॉलेज मध्ये प्रथम येण्याचा मान पटकावला आहे.खारेपाटण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लोकरे व सचिव श्री महेश कोळसुलकर यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

खारेपाटण कनिष्ठ महाविद्यालय विभागनिहाय निकाल पुढील प्रमाणे…
विज्ञान शाखा –
प्रथम – कु.स्नेहा अशोक गुरव – ६०० पैकी ४५९ गुण – (७६.५०% )
द्वितीय – कु.दयाणी दीपाली मनसुख – ६००पैकी ४३८ (७३.००%)
तृतीय – कू. सानिया गणेश राऊत – ६०० पैकी ४३७ गुण (७२.८३%)
सायन्स विभगात एकूण ५३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.सर्व विद्यार्थी पास होऊन या विभगाचा १००% निकाल लागला आहे.
कला शाखा –
प्रथम – कु.अमिषा अनंत पवार – ६०० पैकी ४६६ गुण (७७.६६%)
द्वितीय – कुं. तन्वी विलास तांबे – ६०० पैकी ४४३ गुण (७३.८३%)
तृतीय – कु.माधवी सुनील शेंगाळे – ६०० पैकी ४२७ गुण (७१.१६%)
आर्ट्स विभागात एकूण २९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन या शाखेचा १००% निकाल लागला आहे.
वाणिज्य शाखा –
प्रथम – कु.सानिका सुधाकर कुलकर्णी – ६०० पैकी ५२० गुण (८६.६६%)
द्वितीय – कु.झुल्फा अ.गफार काझी – ६०० पैकी ५१७ गुण (८६.१७%)
तृतीय – कु.सुहानी सुनील मोरे – ६०० पैकी ५१६ (८६.००%)
कॉमर्स शाखेत १०४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.यापैकी १०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.या विभागाचा ९९.०३% निकाल लागला आहे.
तसेच द्वीस्तरिय व्यवसाय अभ्यासक्रमात इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी विभागाचां ८४.६१ % निकाल लागला असून एकूण १३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.यापैकी ११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.तर दीपक राजेंद्र इंगळे हा विद्यार्थी ६६.५०% गुण मिळवून या शाखेत प्रथम आला.तसेच ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी या विभागाचा ९६.००% निकाल लागला असून एकूण २५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.यापैकी २४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.तर अरसलान इम्रान ठाणगे हा विद्यार्थी या विभागात ६९.८३% गुण मिळवून प्रथम आला. व अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विभागात एकूण ९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या विभागाचा १००% निकाल लागला असून कु.पुनम बचुत्तानंद गुंड्ये ही विद्यार्थिनी ७४.५०% गुण मिळवून या विभागात प्रथम आली आहे.
खारेपाटण कनिष्ठ महाविद्यालयातून एकूण २३३ एवढे विद्यार्थी परीक्षेला बसले होते.यापेकी २२९ एवढे विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे खारेपाटण हायस्कूल चे मुख्याद्यापक संजय सानप व पर्यवेक्षक श्री गुरसाळे व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच खारेपाटण शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळाच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.

error: Content is protected !!