बांदा (मंगल कामत) : बांदा येथील नट वाचनालयात धरती बाबा भगवान बिरसा मुंडा यांची १५१ वी जयंती तसेच आदिवासी स्वातंत्र्यसेनानी जनजाती गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी प्रा. एस. व्ही. नाईक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दीपप्रज्वलन करून तसेच भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी नवनिर्वाचित संचालक हेमंत मोर्ये यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्याची आणि स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाची माहिती उपस्थितांना दिली. ब्रिटिश राजवटीविरोधात आदिवासी समाजाला संघटित करून त्यांनी केलेला संघर्ष, सामाजिक जागृती आणि जनजाती समाजाच्या हक्कांसाठी दिलेला लढा यांचा त्यांनी आढावा घेतला.
या कार्यक्रमाला नवनिर्वाचित संचालक नीलेश मोरजकर, राकेश केसरकर, हेमंत मोर्ये, जगन्नाथ सातोस्कर, शंकर नार्वेकर, नागेश सावंत, गुरुनाथ नार्वेकर, सुधीर साटेलकर, अर्चना सावंत, हेमंत खानोलकर, ग्रंथपाल सुस्मिता नाईक, सहाय्यक ग्रंथपाल सावित्री नाईक, कर्मचारी मिताली सावंत व मिलिंद महाजन आदी उपस्थित होते.
धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या विचारांचा जागर यावेळी करण्यात आला.










