बांदा (प्रतिनिधी) : वै. ह. भ. प. प. पू. सद्गुरू वासुदेव महाराज वझे यांच्या आश्रयाखाली चालत आलेल्या झोळंबे येथील श्री पांडुरंग मंदिरात कार्तिक एकादशी निमित्त शुक्रवार २० ते रविवार २२ नोहेंबर पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त पांडुरंग मंदिरात शुक्रवार २० नोहे़बर रोजी रात्री दशमी ज्योती पूजन, त्यानंतर रात्री ८ वाजता हरीपाठाने कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. शनिवारी २१ रोजी पहाटे ५ वाजता, काकड आरती व महापूजा, सकाळी भजन, संध्याकाळी ७ वाजता हरीपाठ, त्यानंतर रात्री ग्रामस्थांची भजने होणार आहे. रविवारी २२ नोहेंबर रोजी पहाटे ५ वाजता काकड आरती, त्यानंतर महापुजा आणि भजने, दुपारी ११ वाजता दींडी व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन झोळंबे पांडुरंग मंदिर व्यवस्थापन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.










