देवगड तालुक्यामधील जलजीवन मिशन कामांमध्ये दिरंगाई नकाे : नितेश राणे

देवगड येथील जलजीवन मिशन आढावा बैठक

देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यामधील जलजीवन मिशन कामांमध्ये कोणतीही दिरंगाई आढळून आल्यास तडजोड करणार नाही, ग्रामसेवक सरपंच व ग्रामीण पाणीपुरवठाच्या अधिका-यांनी समन्वय साधून तालुक्यातील कामे दर्जेदार कशी केली जातील याकडे लक्ष दिले पाहिजे. 1 महिन्यानंतर पुन्हा अशीच आढावा बैठक घेवून झालेल्या जलजीवन मिशनच्या कामांचा आढावा घेणार असल्याचे मत देवगड येथील जलजीवन मिशन अंतर्गत आढावा बैठकीमध्ये आमदार नितेश राणे यांनी सांगितले.

देवगड येथील इंद्रप्रस्थ सभागृहामध्ये आमदार नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील जलजीवन मिशन अंतर्गत कामांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी माजी आमदार अजित गोगटे,पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी करिश्मा नायक,सहाय्यक गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, नायब तहसिलदार श्रीकृष्ण ठाकूर,ग्रामीण पुरवठा चे पाताडे व महाजनी तसेच देवगड तालुक्यातील सरपंच ग्रामसेवक, ठेकेदार व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी प्रत्येक गावाचा आढावा घेताना आमदार नितेश राणे यांनी त्या त्या गावचे सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडून कामाची माहिती घेतली व किती टक्के काम पुर्ण आहे. कामामध्ये कोणत्या अडचणी आहेत या समस्या जाणून घेवून उपस्थित ठेकेदारांना तात्काळ कामे पुर्ण करण्याचे आदेश दिले. एकुण देवगड तालुक्यामधील 66 गावांमधून सुमारे 67 कोटीची कामे चालू आहेत. यामधील काहि गावांची कामे 50 टक्के पूर्ण झाली आहेत.  तर काहि गावांची कामे 20 टक्के 10 टक्के पुर्ण झाली आहेत. तर काहि गावामधील कामे सुरु झालेली नाहीत. झालेल्या काहि गावांच्या कामांबाबात ठेकेदार चांगल्या प्रकारे काम करीत असल्याचे  सरपंच व ग्रामसेवक यांनी सांगितले तर काहि गावांमधील सरपंच व ग्रामसेवकांनी ठेकेदाराच्या तक्रारीचा पाडाच वाचला. अश्या ठेकेदारांना आमदार नितेश राणे यांनी कामे पुर्ण वेळीच पूर्ण झाली नाही तर सदर ठेकेदारांना बदलून दुस-या ठेकेदारांची नेमणूक करण्या विषयक ग्रामीण पाणीपुरवठाच्या अधिका-यांना आदेश दिले. काहि गावांमध्ये पाण्याचा स्त्रोत कमी असल्याचे त्या त्या गावचे सरपंच यांनी आपल्या व्यथा मांडल्या यावेळी आमदार नितेश राणे यांनी विंधन विहिरी सारखे पर्याय उपलब्ध करुन जलजीवन मिशनची कामे पुर्ण केली पाहिजेत तक्रारी व व्यथा न मांडता पर्याय शोधून कामे पुर्णत्वास नेली पाहिजेत विकास कामांमध्ये विकास कामे करतेवेळी अनेक अडथळे येत असतात जागेचा प्रश्न असेल,भौगोलिक परिस्थिती असेल अशा परिस्थितीमध्ये त्या परिस्थितीवरती मात करुन मार्ग शोधून कामे पुर्णत्वास नेण्यासाठी पर्याय शोधणे गरजेचे असतात, पर्याय शोधत असतेवेळी मार्ग नक्कीच सापडतो यामुळे देवगड तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेची कामे दर्जेदार व गुणवत्ता धारक केली पाहिजेत असे आमदार नितेश राणे यांनी सांगितले.

error: Content is protected !!