लक्ष्मण तावडे यांचे निधन

मसुरे (प्रतिनिधी): नाटळ खांदारवाडी येथील लक्ष्मण वि. तावडे ( ८९ वर्ष) यांचे वृद्धापकाळाने मालाड मुंबई येथे निधन झाले.
सिंधुदुर्ग सहकारी बँक मर्यादित, मुंबईचे ते उपाध्यक्ष होते. तसेच सिंधुसागर सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष होते.त्याच बरोबर मौजे नाटळ, खांदारवाडी-दुबळेश्वरवाडी शिक्षणोन्नती मंडळ ,मुंबई या संस्थेचे त्यांनी अध्यक्षपद भूषवले. होते. वृत्तपत्र लेखक म्हणून देखील त्यांची ओळख आहे. क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळ, मुंबईचे सरचिटणीस व त्यानंतर सल्लागार तसेच राज्य शासनाचे विशेष कार्यकारी अधिकारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. मालाड येथे बुधवारी रात्री अंतिम संस्कार करण्यात आले.

error: Content is protected !!