वंदे भारत एक्सप्रेसचे सिंधुदुर्ग भाजपा कणकवलीत करणार भव्य स्वागत

आमदार नितेश राणे, माजी खा.निलेश राणे यांची असणार प्रमुख उपस्थिती

कणकवली (प्रतिनिधी) : वंदे भारत एक्सप्रेसची स्वप्नपूर्ती झाली असून 3 जून रोजी वंदे भारत एक्सप्रेस दुपारी साडे बारा वाजता कणकवली रेल्वे स्थानकावर येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा भाजपाच्या वतीने आमदार नितेश राणे, माजी खा.निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली रेल्वे स्थानकावर वंदे भारत एक्सप्रेसचे भव्य स्वागत केले जाणार आहे.कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान मोदी 3 जून रोजी सकाळी 10 : 30 वाजता मडगाव येथे हिरवा झेंडा दाखवणार आहेत.दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी वंदे भारत एक्सप्रेस कणकवली स्थानकात दाखल होणार आहे. केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या प्रयत्नांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथे वंदे भारत एक्सप्रेसला थांबा मिळाला आहे.त्याआधी वंदे भारत एक्सप्रेसला सिंधुदुर्गात थांबा नव्हता. सुपरफास्ट आणि पूर्ण वातानुकूलित असलेल्या या एक्सप्रेस मधून अत्यंत आरामदायी आणि अगदी कमी वेळेत मुंबईहून कोकणात प्रवास करता येणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्गात याएक्सप्रेसला थांबा मिळावा अशी मागणी कोकण रेल्वे प्रवाशातून होत होती.केंद्रीयमंत्री राणे यांनी थेट केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची भेट घेत वंदे भारत एक्सप्रेसला कणकवलीत थांबा मिळवून घेतला.त्यामुळे सिंधुदुर्गातील जनतेला वंदे भारत एक्सप्रेसने मुंबईला ये जा करणे सहजशक्य होणार आहे.त्यासाठीच कोकण रेल्वे मार्गावर प्रथमच 3 जून रोजी धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचे स्वागत सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा च्या वतीने दुपारी साडे बारा वाजता कणकवली रेल्वे स्थानकावर केले जाणार आहे.यासाठी सिंधुदुर्गवासीय तसेच भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपा जिल्हा सरचिटणीस मनोज रावराणे यांनी केले आहे.

error: Content is protected !!