सौ. वर्षाराणी अभ्यंकर व सौ. आदिती मेस्त्री यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार…..!

प्रतिनिधी (आचरा) : महिला व बालविकास, सामाजिक ०क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रातील दोन कर्तबगार महिलांना राजमाता पुण्यश्लोक अहिल्यांदेवी होळकर पुरस्कार देण्याचा निर्णय केंद्र शासनाच्या माध्यमातून घेण्यात आला. याची अंमलबजावणी 9 मे 2023 पासून करण्यात आली. 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या जयंती दिवशी या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या पुरस्कारात सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व रोख 500 रक्कम यांचा समावेश आहे.
(मसुरे) देवुळवाडा ग्रामपंचायतीच्या या पुरस्काराच्या यावर्षीच्या पहिल्या मानकरी सौ. वर्षाराणी बलवंत अभ्यंकर व सौ.आदिती अमोल मेस्त्री ठरल्या. यांना सरपंच सौ.सुरेखा सतीश वायंगणकर, उपसरपंच नरेंद्र सावंत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सौ. साधना चौगुले, सौ मनीषा बागवे सदस्य अशोक मसुरकर, विठ्ठल लाकम तसेच आशा, अंगणवाडी सेविका आणि ग्रामस्थ महिला, कर्मचारी, आदी उपस्थित होते. कार्यमाचे प्रास्ताविक उपसरपंच नरेन्द्र सावंत तर आभार प्रदर्शन सदस्य.साधना चौगुले यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!