शिवसेना शाखा कनेडी येथे छत्रपती शिवाजी महाराज्यांचा शिवराज्याभिषेक दिन साजरा

शालेय विद्यार्थिनीच्या हस्ते छत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण

कणकवली (प्रतिनिधी): शिवसेना शाखा कनेडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिन शालेय विद्यार्थिनी कस्तुरी गुरुदास नेवाळकर हिच्या हस्ते छत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार घालून साजरा करण्यात आला. छत्रपती शिवराय हे अखंड हिदुस्तान चे दैवत आणि महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे कार्यकर्ते व शिवप्रेमी मोठ्या उत्साहाने साजरा करतात . आज कनेडी उबाठा शिवसेना शाखे मार्फत शिवराज्यभिषेक सोहळा अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. शिवसैनिक गुरु नेवाळकर यांची कन्या कस्तुरी ही आपल्या वाढदिवसानिमित्त चॉकलेट वाटप करण्यास शाखेमध्ये आली होती. शिवसेना ऊ. बा. ठा कणकवली तालुका प्रमुख प्रथमेश सावंत यांनी आज शिवराज्यभिषेकदिनी या विद्यार्थिनी कडूनच शिवपुतळ्यास पुष्पहार घालून साजरा करावा तसेच जिलेबी वाटप करावे असे ठरले . शिवराज्याभिषेक सोहळा कस्तुरी नेवाळकर तसेच तिच्या सहकारी योजना काणेकर, रिया रेवडेकर, प्राजक्ता गोडसे, श्रावणी जाधव यांच्या हस्ते साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख प्रथमेश सावंत , अल्पसंख्याक सेल चे उपजिल्हाध्यक्ष बेनी डिसोजा, मुकेश सावंत, शाखाप्रमुख तुषार गावकर, दिनेश वाळके, जेष्ठ शिवसैनिक बाळा पाटकर, दाजी गावकर, ग्रामपंचायत सदस्य अर्जुन कांबळे, शिवप्रसाद पेंढुरकर, कुणाल सावंत, भिरवंडे सोसायटी चे प्रकाश गावकर, गुरव, सुदर्शन रासम आदी शिवसैनिक उपस्थित होते.

error: Content is protected !!