थोड्याच वेळात होणार मुख्य कार्यक्रमास सुरूवात
कुडाळ ( अमोल गोसावी ) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतुन राज्यभर शासन आपल्या दारी ही योजना राबवत आहेत. हा कार्यक्रम आज कुडाळ येथे संपन्न होत असून सभामंडपात आताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच आगमन झालं असून थोड्याच वेळात भव्यदिव्य अशा शासन आपल्या दारी कार्यक्रमास प्रत्यक्ष सुरुवात होत आहे. त्यांच्या सोबत जिल्ह्याचे नेते केंद्रिय मंत्री नारायण राणे, मंत्री गिरीश महाजन. पालकमंत्री रवींद्र चव्हाण , उद्योगमंत्री उदय सामंत , शिक्षण मंत्री दिपक केसरकर , आमदार रविंद्र फाटक , आमदार नितेश राणे , माजी खासदार निलेश राणे , माजी खासदार सुधीर सावंत , जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी. एस. पी. सौरभ अग्रवाल, जि. प. सी ई ओ प्रजित नायर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे , भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली , भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर , या कार्यक्रमासाठी १५ हजार पेक्षा अधिक लाभार्थी तसेच जिल्ह्यातील जनता मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.











