सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : पंतप्रधान मोदींचा मागील 9 वर्षांतील कार्यकाल हा देशासाठी सुवर्णकाळ म्हणावा लागेल.2024 च्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत भाजपा मोठ्या मताधिकय्यानें विजयी होणार आहे. मोदी @ 9 अंतर्गत पंतप्रधान मोदी यांनी मागील 9 वर्षांत भारत देशाला प्रगतीपथावर नेले आहे.लोकहिताच्या 80 नवीन योजना सुरू केल्या आहेत. पंतप्रधान पासून आमदार पर्यंत लोकसेवेची कामे कशी करतात हे बुद्धिजीवी वर्गातून जाणून घेण्यासाठी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बुद्धिजीवी वर्गाशी आज संवाद साधला असे केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.यावेळी आमदार नितेश राणे, माजी खा निलेश राणे,माजी आमदार प्रमोद जठार , भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, अतुल काळसेकर आदी उपस्थित होते. जी 20 चे अध्यक्ष आपले पंतप्रधान मोदी आहेत. आपला देश महासत्ता बनणार आहे. भाजपा राजवटीत देश महासत्ता बनणार ही आनंदाची गोष्ट आहे असे उद्योगमंत्री राणे म्हणाले.











