रांगणा तुळसुलीतील मोहन तेंडुलकर यांना शिवसेना ( शिंदे गट ) पदाधिकाऱ्यांकडून मदत

घराच्या छपरासाठी उपलब्ध करून दिले साहित्य

कुडाळ ( अमोल गोसावी ) : कुडाळ तालुक्यातील रांगणा तुळसुली येथील मोहन विनायक तेंडुलकर यांच्या घराचे छप्पर दोन वर्षापूर्वी वादळी वाऱ्याने उडून घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे ते बेघर होऊन बाजूला असलेल्या भावाच्या घरी पडवीत राहत होते. ही बाब स्थानिक लोकप्रतिनिधींनी शिवसेना पदाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली. दरम्यान तेंडोलकर यांना घरासाठी आवश्यक असलेल्या साहित्याची माहिती घेऊन त्यांना सदर साहित्य देण्याची तयारी शिवसेना ( शिंदे गट ) पदाधिकारी यांनी दर्शवली आणि काल गुरुवार ८ जून रोजी रांगणा तुळसुली येथील त्यांच्या घरी छपरासाठीचे आवश्यक साहित्य पोहोच करण्यात आले. सर्व साहित्य शिवसेना जिल्हा महिला आघाडी प्रमुख वर्षा कुडाळकर , तालुकाप्रमुख योगेश ( बंटी ) तुळसकर , महिला आघाडी तालुकाप्रमुख सिद्धी शिरसाट यांच्या उपस्थितीत मोहन तेंडुलकर यांना देण्यात आले. यावेळी तेंडुलकर यांनी उपस्थित शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

error: Content is protected !!