तरंदळे ग्रा पं ,कृषी विभागाच्या वतीने श्री पद्धतीच्या भात पेरणी चे प्रात्यक्षिक

शेतकऱ्यांना मोफत भात बियाणे वाटप

कणकवली (प्रतिनिधी): ग्रामपंचायत तरंदळे व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भात बियाणे वाटप करण्यात आले.ह्यावेळी कृषी सेविका तांबे यांनी श्री पद्धतीने भात पेरणी कशी करावी आपल्या उत्पादनामध्ये वाढ कशी करावी ह्याच प्रात्यक्षिक दिलं.तसेच त्यांनी पी एम किसान ई केवायसी काही लाभार्थी यांचे करायचे बाकी होते त्यांचे करून दिले. व बाकीच्यांचे राहिले आहेत त्यांनी लवकरात लवकर करण्याचे आव्हान केले.कृषी विषयक माहिती सुध्दा दिली.तसेच आरोग्य अधिकारी चव्हान यांनी आरोग्य विषयक माहिती दिली.उपस्तिथामध्ये सरपंच श्री. सुशिल विजय कदम ,ग्रामसेवक सौ.रेश्मा पालकर, माजी सरपंच श्री .सुधीर सावंत,ग्रामपंचायत सदस्य श्री.दीपक घाडी गावकर,तेजस सावंत,नेहा घाडीगावकर,अभय सावंत, शिवराम गावकर,वनिता कदम,आशा ताई,अंगणवाडी सेविका,सामाजिक कार्यकर्ते श्री.मधुसूदन सावंत,तसेच गावातील आजी माजी ,सन्माननीय,ज्येष्ठ,महिला,नागरिक उपस्थित होते.

error: Content is protected !!