वीज कोसळून घराला तडे ; वेताळ बांबर्डे येथील घटना

कुडाळ ( अमोल गोसावी ) : वेताळ बांबर्डे गावातील नाना विठू राणे (राहणार :दारवळवाडी) यांच्या घरावर शनिवारी वीज पडून त्यांच्या घराच्या भिंतींना दोन्ही बाजूने मोठे तडे जावून घराचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच ऐन पावसात घराचे छप्पर बऱ्याच ठिकाणी कोसळले. या बाबतची माहिती मिळताच सरपंच वेदिका दळवी, उपसरपंच प्रदीप गावडे यांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली.

error: Content is protected !!