कणकवली (प्रतिनिधी) : कणकवलीचे नवनियुक्त डी वाय एस पी किशोर सावंत यांचे शिवसेना उद्धव ठाकरे गटा तर्फे स्वागत करण्यात आले. कणकवली तालुक्यात निपक्षपाती पणे कारभार चालवावं तसेच जुगार मटका ऑनलाइन कॅसिनो गोवा दारू विक्री व तरुणाईत वाढत चाललेली गांजा विक्री यासारखे कणकवलीत तालुक्यात चालणारे अनैतिक धंदे यावर लवकरात लवकर पायबंदी उपाय करावे याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, युवासेना समन्वयक राजू राठोड, महिला प्रतिनिधी सौ. माधवी दळवी, आवसारे मॅडम, महेश कोदे, निलेश सावंत उपस्थित होते.













