विषप्राशन केलेल्या कासार्डेतील युवकाचा मृत्यू

कणकवली (प्रतिनिधी): गवत मारायचे औषध पिलेल्या युवकाचा कणकवली येथील खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला असून ऋषिकेश अनंत घाडी ( वय 30 रा. कासार्डे दाबवाडी ) असे मृत युवकाचे नाव आहे.याबाबत ची खबर मयत ऋषीकेश याचा भाऊ समीर अनंत घाडी याने दिल्याची माहिती कणकवली पोलीस ठाण्यातून देण्यात आली. कणकवली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत ऋषिकेश अनंत घाडी याने 12 जून रोजी राहत्या घरी गवत मारायचे औषध प्राशन केले.त्याला अत्यवस्थ वाटू लागल्याने कणकवलीत खाजगी रुग्णालयात लागलीच दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा आज मृत्यू झाला.

error: Content is protected !!