कुपेरीची घाटीत मालवण – बार्शी एस टी बसला अपघात

रस्त्याच्या बाजूला बारा फूट खाली कोसळत दोन वेळा पलटी

चालक जखमी प्रवाशी किरकोळ जखमी बसचे नुकसान

चौके ( अमोल गोसावी ) : बुधवारी पहाटे ४.५० ला मालवण आगारातून सुटणारी मालवण बार्शी (एम एच २० बी एल २९५८)या एसटी बसचा कुपेरीची घाटी उताराच्या वळणावर चालत्या बसचा स्टेरींग लॉक झाल्याने ६.१५ वाजण्याच्या दरम्यान भीषण अपघात झाला. या आपघातावेळी मिळालेल्या माहितीप्रमाणे १८ प्रवाशी प्रवास करत होते. या अपघातात बस रस्त्याच्या बाजुला कोसळत दोन वेळा पलटी होत एसटी पुन्हा उभी राहिली. सुदैवाने मोठी जिवीतहानी टळली असून अपघातात मालवण आगारातील चालक सांगळे हे जखमी झाले असून त्यांना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तर वाहक देशमुख व इतर प्रवाशी किरकोळ जखमी झाले. पहाटे अपघात झाल्याने मार्गावरुन जाणाऱ्या वहानचालक तसेच कुणकावळे ग्रामस्थानी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी मालवण आगाराचे व्यावस्थापक आणि कर्मचारी चालक यानीही अपघातस्थळी धाव घेतली.

error: Content is protected !!