आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

खारेपाटण महाविद्यालयात छ.शाहू महाराज यांची जयंती साजरी

“शोषितांना माणुस म्हणून जगण्याची संधी शाहू महाराजांनी दिली.” – प्रा.डॉ. आत्माराम कांबळे खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कक्ष आणि आजीवन अध्ययन व विस्तार विभाग यांच्या वतीने लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू…

रोटरी क्लब वैभववाडी यांच्या वतीने खारेपाटण हायस्कूलला १०० बेंचेस व १० वर्ग फलक भेट

खारेपाटण (प्रतिनिधी) : वैभववाडी येथे कार्यरत असणाऱ्या रोटरी क्लब ऑफ वैभववाडी यांजकडून खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण या हायस्कूलला सुमारे १०० बेंचेस व दहा वर्ग फलक नुकतेच रोटरी क्लब चे अध्यक्ष संजय रावराणे यांच्या…

मराठे कॉलेज मध्ये छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

फोंडाघाट (प्रतिनिधी) : राजाराम मराठे कृषि महाविद्यालय फोंडाघाट कॉलेज मध्ये राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी केली. या कार्यक्रमादरम्यान सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका यांनी प्रतिमेचे पूजन करून पुष्प अर्पण केले.तसेच प्राद्यापक के. आर. भोकरे यांनी छत्रपती शाहू महाराज यांचा कार्यावर प्रकाश…

फ्लोरेट कॉलेज ऑफ डिझायनिंग आता नीलम विद्यापीठाशी संलग्न

कणकवली (प्रतिनिधी) : फ्लोरेट कॉलेज ऑफ डिझायनिंग हें कॉलेज फॅशन आणि इंटिरिअर डिझायनिंगसाठी व्यापक असे कार्य करित आहे.या कॉलेज च्या विविध शाखा देखील असून सर्वत्र असंख्य विदयार्थी यां कॉलेज मधून दर्जेदार शिक्षण घेतात.नुकतीच यां कॉलेज ला नीलम विद्यापीठाची मान्यता मिळाली…

कोकण पदवीधर निवडणुक ; मालवण तालुक्यात ८०.९१ टक्के मतदान

भाजपा महायुतीच्या विजयाचा पदाधिकारी कार्यकर्ते यांनी व्यक्त केला ठाम विश्वास आचरा (प्रतिनिधी) : कोकण विभाग पदवीधर मतदारसंघसाठी बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडली. मालवण तालुक्यात पाचही मतदान केंद्रावर शांततेत मतदान झाले. मालवण तालुक्यातील १८४४ मतदारांपैकी १४९२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तालुक्यात…

कोकण पदवीधर निवडणुकीसाठी सिंधुदुर्गात 81.1 टक्के मतदान

महायुतीचे निरंजन डावखरे, महाविकास आघाडीचे रमेश किर यांच्यात लढत ; 1 जुलै राेजी मतमाेजणी सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : कोकण विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८०.१ टक्के मतदान झाले आहे. एकूण १८.५५१ मतदारांपैकी १४,८५८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. या…

एस. एम. हायस्कूल कणकवलीमध्ये अंमली पदार्थ सेवन विरोधी दिन साजरा

कणकवली (प्रतिनिधी) : 26 जून हा आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ सेवन विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाच्या निमित्ताने एस. एम. हायस्कूल कणकवलीमध्ये अंमली पदार्थ आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाचे मानवी आरोग्यावर आणि सामाजिक आरोग्यावर होणारे दुष्परिणाम या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान…

कांदळगाव शाळेचे छप्पर कोसळण्यास जिल्ह्यातील सत्ताधारीच जबाबदार – सरपंच रणजित परब

मालवण (प्रतिनिधी) : कांदळगाव जि प. शाळा नंबर २ चे छप्पर कोसळून वित्तहानी झाली. हे छप्पर गेल्या वर्षभरापासून नादुरुस्त होते. शाळांच्या छप्परांची दुरुस्ती जिल्हा नियोजनच्या निधी मधून केली जाते. त्यासाठी वेगळा कुठलाही निधी नसतो. ग्रामपंचायत देखील छप्पर दुरुस्तीचा खर्च करू…

पदवीधर निवडणुकीसाठी आ. वैभव नाईक यांनी बजावला मतदानाचा हक्क

कणकवली (प्रतिनिधी) : कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे मतदान आज होत असून कणकवली तहसील कार्यालय येथील मतदान केंद्रावर कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी मतदानाचा हक्क बजावला.महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर हे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास…

वैभववाडी शहरात आठवडा बाजारात वाहतूक कोंडीची समस्या तिव्र

दत्त मंदिर पासून ५०० मिटर परिसरात नो पार्किंग झोन जाहीर करावा प्रवाशांकडून मागणी वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी शहरात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाभवे -वैभववाडी नगरपंचायतच्या माध्यमातून वैभववाडी शहरात दत्त मंदिर पासून सांगुळवाडी रोड कडे जाणाऱ्या रस्त्याच्या एका बाजूला…

error: Content is protected !!