कणकवली अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना यूनाइटेड किंगडम ऑफ ग्रेट ब्रिटेन कडून पेटंट

सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ कणकवलीच्या विद्यार्थ्यांना यूनाइटेड किंगडम ऑफ ग्रेट ब्रिटेन कडून पेटंट बहाल

कणकवली (प्रतिनिधी) : महाविद्यालयाची इलेक्ट्रिकल विभागाची विद्यार्थीनी कु. गौरांगी सावंत व मेकॅनिकल विभागाचे विद्यार्थी कु. सईश वाडकर, कु. आदेश सावंत, कु. दर्शन माटावकर, कु. कार्तिक मोरे, कु. अभिषेक कविटकर यांच्या संशोधण्याच्या विषयाचे सर्वच सामाजिक स्तरांकडून कौतुक केले जात आहे. कणकवली अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या या संशोधनाची “यूनाइटेड किंगडम ऑफ ग्रेट ब्रिटेन” सरकारने दखल घेऊन त्यांना पुढील संशोधनासाठी प्रोत्साहन दिले आहे. या संशोधनाच्या फायद्याने कचरा वेगळे करणे सहजरित्य शक्य होणार असुन त्याचा वापर घरगुती कचरा वेगळा करण्यासाठी होऊ शकेल.

सदर पेटंट मेकॅनिकल इंजिनीरिंग विभागाचे प्राध्यापक कल्पेश सुनील कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली नोंदणी करण्यात आले असून त्याला आंतरराष्ट्रीय पेटंट मिळणे हि संस्थेसाठीअभिमानाची बाब असल्यची भावना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.एस. बाडकर व प्रशासकीय अधिकारी श्री. शांतेश रावराणे यांनी व्यक्त केली आहे. या कार्यक्रमासाठी एस. एस. पी. एम. संस्थेचे संस्थापक केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे, अध्यक्षा निलमताई राणे, उपाध्यक्ष माजी खासदार निलेश राणे, सचिव आ. नितेश राणे, प्रशासकीय अधिकारीशांतेश रावराणे, प्राचार्य डॉ. डी . एस. बाडकर , सर्व विभागप्रमुख तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!