महाराष्ट्रातील शिंदे – फडणवीस सरकारने पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तांडा वस्तीला निधी मंजूर केला – नवलराज काळे
भाजपा भटके – विमुक्त आघाडी प्रदेश उपाध्यक्ष शांताराम ( बाळा ) गोसावी यांची प्रमुख उपस्थिती
वेंगुर्ले (प्रतिनिधी) : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या प्रचारार्थ भाजपा भटके – विमुक्त आघाडीचे पदाधिकारी कामाला लागले असून रविवार दिनांक 21 एप्रिल रोजी वेंगुर्लेत त्यांनी भाजपा कार्यालयात भेट दिली. यावेळी तालुक्याच्या वतीने आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष शांताराम ( बाळा ) गोसावी, जिल्हाध्यक्ष नवलराज काळे व जिल्हा उपाध्यक्ष भरत गोरे यांचे स्वागत निलेश सामंत यांनी केले .
यावेळी भटके – विमुक्त आघाडीच्या वतीने वाडी ‐ वस्तीवर तसेच तांड्यावर जाऊन भेट देऊन पुन्हा एकवार मोदी सरकार तसेच मोदींच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी राणे साहेबांना भटक्या – विमुक्त ची जास्तीत जास्त मते देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगीतले.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई, जि.का.का.सदस्य मनवेल फर्नांडिस, सरपंच संघटनेचे विष्णु उर्फ पपु परब, अल्पसंख्याक आघाडीचे सायमन आल्मेडा, बुथप्रमुख पुंडलिक हळदणकर, रामा झिमु शिंदे इत्यादी उपस्थित होते.