संजीव राऊत प्रथम तर सायली म्हाडगुत द्वितीय

कै.गाडगीळ गुरुजी’ मोफत वाचनालय त्रिंबक आयोजित कै.दादा ठाकूर स्मृती प्रित्यर्थ जिल्हास्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धा

श्रद्धा मडव तृतीय तर पत्रकार संग्राम कासले व चंद्रशेखर हडप यांना उत्तेजनार्थ पारितोषिक

आचरा (विवेक परब) : वाचन कला विकास समिती त्रिंबक संचलित ‘कै.गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालय त्रिंबक’ यांचे वतीने कै.दादा ठाकूर स्मृतिपित्यर्थ जिल्हास्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धा जनता विद्या मंदिर त्रिंबक येथे संपन्न झाली. स्पर्धेत संजीव आत्माराम राऊत, देवगड याने प्रथम क्रमांक सायली गुरुनाथ म्हाडगुत, मसुरे यांनी द्वितीय क्रमांक, श्रद्धा सत्यवान मडव, जांभवडे यांनी तृतीय क्रमांक तर संग्राम सतीश कासले मालवण, चंद्रशेखर चिंतामण हडप, काळसे यांनी उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त केले.

स्पर्धेचे परीक्षक म्हणून एकनाथ गायकवाड व अनघा कदम मॅडम यांनी काम पाहिले. स्पर्धेचा उद्घाटन सोहळा सुरेंद्र (अन्ना) सिताराम सकपाळ-अध्यक्ष वाचन कला विकास समिती त्रिंबक’ यांच्या अध्यक्षतेखाली आणि सुरेश शामराव ठाकूर, ‘अध्यक्ष कोकण मराठी साहित्य परिषद मालवण’ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. स्पर्धेचे उद्घाटन विनिता कांबळी, ‘ग्रंथपाल रामेश्वर वाचन मंदिर आचरा’ यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी विनीता कांबळी यांनी उद्घाटन पर आपले विचार मांडले तर प्रमुख अतिथी सुरेश शामराव ठाकूर गुरुजी यांनी स्पर्धेच्या आयोजनाबद्दल समितीचे कौतुक केले. तसेच सुरेंद्र सकपाळ यांनी अध्यक्षीय भाषणात संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला.

या स्पर्धेत एकूण 12 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेमध्ये ‘अंधश्रद्धा निर्मूलन काळाची गरज’, ‘सुशिक्षित होऊ या की सुसंस्कृत’,चांद्रयान ‘मोहीम आणि भारत’ व ‘छत्रपती शिवराय -जाणता राजा’ या चार पैकी एका विषयावर स्पर्धकांनी आपले विचार मांडले. विशेष म्हणजे यावेळी संयोजन समितीकडून ‘चोखंदळ श्रोता स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत विनिता कांबळी मॅडम व कदम सर सहाय्यक शिक्षक जांभवडे हायस्कूल, यांनी पुरस्कार पटकावले. यावेळी ग्रंथपाल अमेय लेले, सहग्रंथपाल

विवेक जाधव, लिपिक, श्रीम गोसावी, चैताली सुतार हे ग्रंथालयीन कर्मचारी तसेच माध्यमिक शिक्षण समिती त्रिंबकचे माजी अध्यक्ष डॉ. सुधीर मेहेंदळे, जनता विद्या मंदिर त्रिंबकचे मुख्याध्यापक प्रवीण घाडी, प्रशांत मेहेंदळे, कार्यवाह, कासले, कदम, महेंद्र वारंग क्रीडा शिक्षक जनता विद्या मंदिर त्रिंबक आदी सदस्य उपस्थित होते. स्पर्धेचे प्रास्ताविक प्रवीण घाडी यांनी केले तर आभार ग्रंथपाल अमेय लेले यांनी मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र वारंग यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!