सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : आर्ट ऑफ लिव्हिंग च्या वतीने कुडाळ हुमरमळा येथील श्री. पुष्पसेन सावंत फार्मसी कॉलेज येथे 28 एप्रिल ते 4 मे दरम्यान युवा नेतृत्व प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सिनिअर ऑल फॅकल्टी तथा मास्टर ट्रेनर राजेंद्र राऊत सर या शिबिरात प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. आर्ट ऑफ लिव्हिंग ही संस्था मागील 42 वर्षांत भारतासह जगातील 180 देशात कार्यरत असून 50 कोटी जनतेला याचा फायदा झाला आहे. भक्ती आणि शक्ती चा अनोखा मिलाफ या शिबिरातून युवकांना अनुभवयास मिळणार आहे.निरोगी शरीर व सुदृढ मन, नेतृत्व कौशल्य व्यक्तीमत्व विकास, आत्मविश्वास व निर्णयक्षमता वाढविणे, संवाद कौशल्य विकसनाची तंत्रे,जबाबदारीची जाणीव व सांघिक कार्यकुशलता, अनाकारण भिती, चिंता राग यापासून मुक्ती बाबत या शिबिरात मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच योग आणि प्राणायाम, ध्यान, सुदर्शन क्रिया, ज्ञान, संगीत, खेळ आदी बाबीही प्रशिक्षणादरम्यान शिकता येणार आहेत. अधिक माहितीसाठी मोबा. 9657479866 / 9975355387 / 7719813360 यांच्याशी संपर्क साधावा.