संजय राऊत म्हणजे राजकारणातील शक्ती कपूर
मिलिंद नार्वेकर झाकी है श्रीधर पाटणकर बाकी है
आमदार नितेश राणेंचा राणे स्टाईल प्रहार
सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : कर्नाटकमध्ये पंतप्रधान मोदींनी काँग्रेसच्या जाहिरनाम्याची सत्यता सांगितली. यावर बोलताना संजय राजाराम राऊत निर्लज्जपणे म्हणतो की मोदी आता महिलांच्या मंगळसूत्र पर्यंत पोचले आहेत. नालायक राऊत ने आपला इतिहास बघावा. डॉ. स्वप्ना पाटकर पासून चा इतिहास काढावा लागेल, गोरेगाव च्या रॉयल पाल्म्समध्ये काय होते ? दिशा सालीयन चा रेप करून तिची हत्या करण्यात आली. ती आपल्या प्रियकरासोबत लग्न करणार होती. तिच्या मंगळसूत्राची काळजी नाही वाटली ? संजय राजाराम राऊत च्या कारनाम्यांची वेबसिरीजच काढावी लागेल अशा शब्दांत भाजपा प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी राणे स्टाईल ने हल्लाबोल केला.
लखनौ च्या एका प्रॉपर्टी बाबत ईडी आणि इन्कम टॅक्स ने मोठी कारवाई केली.ती प्रॉपर्टी श्रीधर पाटणकर ची होती. हा श्रीधर पाटणकर उद्धव ठाकरेंचा मेहुणा होता. आपला मेहुणा कधीही जेलमध्ये जाईल, येता पावसाळा आपल्या मेहुण्याला आर्थर रोड जेलमध्ये घालावावा लागणार आहे याची कल्पना आल्यामुळेच उद्धव पिसाळलेल्या कुत्र्यप्रमाणे मोदी आणि भाजपाच्या नावाने बोंब मारत आहेत. संजय राऊत हा राजकारणातील शक्ती कपूर आहे. महिलेला जाहीर शिव्या घालतो, तिला धमकी देतो, त्या राऊत ने आम्हाला शिकवू नये. संजय राऊत चे न्यूझीलंड हाऊस, पाल्म हाऊस चे कारनामे सर्वश्रुत आहेत. हिंदू धर्मातील देवीदेवतांची नावे घेण्याचाही अधिकार आता उबाठा ला राहिलेला नाही. देवांची आणि छत्रपतींची नावे घेऊन आजवर उद्धव ठाकरे यांनी केवळ खंडणी मागण्याचे काम केले. अरविंद केजरीवाल हा सत्पुरुष नसून मद्य पॉलिसी घोटाळ्यात जेलमध्ये गेला आहे. मातोश्री आता खंडणीखोर भवन राहिले आहे. स्व. बाळासाहेबांचा आणि आताच्या मातोश्री चा काडीचाही संबंध राहिला नाही अशी टीकाही आमदार नितेश राणे यांनी केला. निवडणूक आयोगाने घेतलेला आक्षेप हा योग्य आहे. संजय राऊत विरोधकांना इशारा देत देत आर्थर रोड जेल मध्ये जाणार आहे. आणि नंतर भिंतींकडे पाहत इशारे देत बसणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता उद्धव ठाकरेंची सगळी पोलखोल करत आहेत. मिलिंद नार्वेकर ही झाकी है श्रीधर पाटणकर बाकी है असे सांगत स्व. बाळासाहेबांचा बॉडीगार्ड थापा याना सोडून एकनाथ शिंदेंकडे गेला, उद्धव ने स्वतःच्या भावाची जयदेव ठाकरे यांची प्रॉपर्टी हडप केली. असा स्वार्थी उद्धव ठाकरे कोणाचाही होऊ शकत नाही असा घणाघात आमदार नितेश राणे यांनी केला.