रवींद्रनाथ मुसळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १ फेब्रुवारी रोजी गोपुरी आश्रम येथे दिव्यांग मेळावा.!

गणेश हुक्कीरे समाज कल्याण अधिकाऱ्यांचे असणार विशेष मार्गदर्शन

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील गोपुरी आश्रम या ठिकाणी कै. रवींद्रनाथ मुसळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ १ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ठीक १०:३० वा. जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांचा भव्य दिव्यांग मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तरी या मेळाव्यास जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बंधू भगिनींनी उपस्थित रहावे, असे आवाहन एकता दिव्यांग विकास संस्थाध्यक्ष सुनील सावंत यांनी केले आहे. तसेच या मेळाव्या दरम्यान, विविध क्षेत्रात काम करणाऱ्या दिव्यांग व्यक्तींचा सन्मान होणार आहे. सन ( २०२१ – २२ ) १२ वी. पास, पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या दिव्यांग बांधवांचा देखील यावेळी सन्मान केला जाणार आहे. तसेच मी पाहिलेली दिव्यांग व्यक्ती, मी अनुभवलेला दिव्यांग व दिव्यांगांची व्यथा या विषयावर किमान ५ मिनिटे अशी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. प्रथम नाव नोंदवणाऱ्या १५ जणांना स्पर्धेत सहभागी होता येणार. इच्छुकांनी सचिन सादये मोबा. ९८६०७१८९४९ यांच्याशी संपर्क करून आपली नाव नोंदणी करून घ्यावे.

सदर दिव्यांग मेळाव्यास गणेश हुक्कीरे समाज कल्याण निरीक्षक सिंधुदुर्ग, रमेश पवार ( तहसीलदार कणकवली ), डॉ. विद्याधर तायशेट्ये, डॉ. धनंजय रासम, डॉ प्रफुल्ल आंबेरकर, संदीप परब ( संविताश्रम पणदूर ), दीपक बेलवलकर ( व्यापारी महासंघ अध्यक्ष ) यांना भव्य दिव्यांग मेळाव्यास निमंत्रित करण्यात येणार आहे.

तसेच हा मेळावा दिव्यांग व्यक्तींना प्रशासकीय कामांच्या दृष्टीने तसेच वेगवेगळ्या अनुदानासाठी उद्भवणाऱ्या समस्यांसाठी मोलाचा ठरणार आहे. अशी माहिती देखील एकता दिव्यांग विकास संस्थाध्यक्ष सुनील सावंत यांनी दिली.

अधिक माहितीसाठी सचिन सादये ९८६०७१८९४९, सुनील सावंत ९४२०६५४६२४, मयुर ठाकूर ९११९५३२८७० यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!