तळेरे पं. स. चे महायुतीचे उमेदवार राजेश जाधव यांची तळेरे बाजारपेठेत प्रचार रॅली

नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघातील तळेरे पंचायत समितीचे भाजप व शिवसेना शिंदे पक्ष आणि राष्ट्रवादी आर. पी. आय. महायुतीचे अधिकृत उमेदवार राजेश अनंत जाधव यांच्या प्रचारार्थ आज बुधवार दि. ४ फेब्रुवारी २०२५ रोजी तळेरे बाजारपेठ येथे भाजप तालुका अध्यक्ष दिलीप तळेकर व शिवसेना तालुका अध्यक्ष मंगेश गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य प्रचार रॅली काढण्यात आली.

यावेळी खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघातून बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवार प्राची ईसवलकर खारेपाटण पंचायत समिती मतदार संघाचे उमेदवार गुरुप्रसाद शिंदे व तळेरे पंचायत समितीचे उमेदवार राजेश जाधव प्रामुख्याने उपस्थित होते. तळेरे बाजारपेठेतील व्यापारी व नागरिक यांच्या गाठी भेटी घेण्यात आल्या आणि महायुतीच्याच उमेदवारांना निवडून आणण्याचे आवाहन कार्यकर्त्याच्या वतीने मतदारांना करण्यात आले.

तळेरे बाजारपेठ येथे काढण्यात आलेल्या महायुतीच्या प्रचार रॅलीत माजी तालुका अध्यक्ष व माजी पंचायत समिती सभापती संतोष कानडे, शिवसेना शिंदे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख शरद वायंगणकर, भाजप पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते रामकांत राऊत, प्रज्ञा ढवन, माजी जि. प. सदस्य रवींद्र उर्फ बाळा जठार, भाजप शक्ती केंद्र प्रमुख सूर्यकांत भालेकर, तळेरे सरपंच हनुमंत तळेकर, कुरंगावणे बेर्ले सरापंच पप्पू ब्रम्हदंडे, शेर्पे सरपंच स्मिता पांचाळ, शिडवणे सरपंच रवींद्र शेट्ये, खारेपाटण उपसरपंच महेंद्र गुरव, वारगाव उपसरपंच नाना शेट्ये, साळीस्ते उपसरपंच श्री. गुरव, बूथ अध्यक्ष शैलेश सुर्वे, रोहित महाडिक, भाजप महिला कार्यकर्त्या आरती गाठे, आशा गुरव, शिवसेना शिंदे पक्षाचे कार्यकर्ते मंगेश ब्रम्हदंडे, सुहास राऊत, गौरी शिंदे, भाजप कार्यकर्ते किशोर माळवदे, चंदू शिंदे, मंगेश कांबळे, मयुरेश लिंगायत, दिनेश मुद्रस, श्रीकांत वरूणकर, प्रकाश साटम, प्रदीप घाडी, उदय बारसकर, सागर डंबे, नामदेव वाडेकर, संजय लाड, निलेश सोरभ आदी खारेपाटण व तळेरे मधील महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान तळेरे पंचायत समिती महायुतीचे भाजप पक्षाचे उमेदवार श्री राजेश जाधव यांना जनतेचा वाढता पाठिंबा मिळत असून या मतदार संघातून श्री राजेश जाधव यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

error: Content is protected !!