दाजीपूर ची बैठक आली अंगलट ..1 लाख लॉस

कोल्हापूर एसपी नी घेतलीय आपला सिंधुदुर्ग न्यूज ची दखल

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातून आपला जुगाराचा गाशा गुंडाळून रविवारी 18 जून रोजी दाजीपूर मध्ये सुरू केलेल्या जुगार अड्ड्याला मुहूर्तालाच नाट लागली असून मोरजे चा कर  आणि तक्षिमदार 1 लाख 10 हजार ला लॉस झाले आहेत. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीत 18 जूनपासून सुरू झालेल्या या जुगार अड्ड्याची बातमी आपला सिंधुदुर्ग न्यूज चॅनेल वर व्हायरल झाली आणि त्याची दखल कोल्हापूर चे नूतन एसपी पंडित यांनी घेतल्याची माहिती आहे. तेथील स्थानिक पोलिसांना हाताशी धरून दाजीपुरात जुगार अड्डा सुरू केलाय खरा पण कोणत्याही दिवशी नकळत सर्व जुगारींची गचांडी कोल्हापूर चे नूतन एसपी पंडित आवळणार आहेत.काल रविवारी 18 जून रोजी मोरजे च्या करा ने आपल्या तक्षिमदारांसह जुगार खेणाऱ्या साथीदारांना दाजीपूर मध्ये बोलावत जुगार अड्डा सुरू केला. लाखो कमावण्याच्या ऐवजी लाखाचे खाक झाले आणि 1 लाख 10 हजार लॉस होण्याची वेळ मुहूर्तालाच आली.

error: Content is protected !!