जि प शाळा तुळसुली चव्हाटाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

कुडाळ (प्रतिनिधी) : कोरोना काळात खंड पडलेला वार्षिक स्नेहसंमेलन आणि विद्यार्थी गुणगौरव बक्षीस वितरण कार्यक्रम शिवराज्याभिषेक समिती अध्यक्ष सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली दुबई स्थित श्रीधर सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या दिमाखात संपन्न झाला. सर्वांगीण विकासासाठी योगदान देणाऱ्या पंचक्रोशीतील दानशूर व्यक्तींचा सत्कार करून त्यांचे ऋणनिर्देशन करण्यात आले. त्यामध्ये परशुराम वारंग., लिंगेश्वर विद्यालयाचे माजी प्राचार्य अमृतराव जगताप नवनिर्वाचित सरपंच मिलिंद नाईक, भिकाजी जाधव, नारायण वारंग, बंड्या वारंग, प्रकाश पै, तेजस मेस्त्री, निवास सातार्डेकर, रोटरी क्लब सदस्य मकरंद नाईक, माजी सैनिक सुरेश पै, विठ्ठल वारंग आणि शरद वारंग यांचा यथोचित सत्कार शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष- संजना संतोष वारंग, उपाध्यक्ष समृद्धी सातार्डेकर, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष -उमा वेंगुर्लेकर, माता पालक संघ उपाध्यक्ष – तन्वी तुळसुलकर यांच्या हस्ते करण्यात आला करण्यात आला.

त्यानंतर मान्यवरांच्या शुभहस्ते विद्यार्थी गुणगौरव व बक्षीस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या उपशिक्षिका स्वाती आरेकर,सूत्रसंचालन मुख्याध्यापक हरिश्चंद्र कालेलकर यांनी केले उपस्थित यांचे आभार शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजना वारंग यांनी मानले. त्यानंतर विद्यार्थ्यांचे विविध कला गुणदर्शनाचे कार्यक्रम आणि बाल दशावतार नाटक संपन्न झाले. अशाप्रकारे वार्षिक स्नेहसंमेलनाचा दिमाखदार सोहळा पार पडला.

error: Content is protected !!