आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त हळवल गावात वह्या व खाऊचे वाटप

कणकवली (प्रतिनिधी): आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त हळवल गावात भाजपाच्या माध्यातून शालेय मुलांना वह्यांचे वाटप करण्यात आले. आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कळसुली जिल्हापरिषद मतदार संघात अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हळवल गावातील तिन्ही शाळांमध्ये वह्या पेन व खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी हळवल सरपंच अपर्णा ठाकूर, उपसरपंच सान्वी गावडे, माजी सरपंच शशिकांत राणे, संतोष गुरव, माजी उपसरपंच लक्ष्मण गावडे, वामन परब, लवु परब, शिवा राणे, मंगेश गावडे, सुदर्शन राणे, दिनेश राणे, भरत गावडे, उमेश ठाकूर आदींसह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी चिमुकल्यांनी देखील आमदार नितेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!