चौके ( अमोल गोसावी ) : भ. ता. चव्हाण महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय चौके व स्थानिक समिती यांच्या वतीने माजी मुख्याध्यापक राजन खोचरे सर यांचा सेवानिवृत्ती सेवा साफल्य निरोप समारंभ तसेच यशवंत व गुणवंत विद्यार्थी गुणगौरव व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी गौरव सोहळा उद्या शनिवार दिनांक २४ जून रोजी सकाळी ९:३० वाजता भ. ता. चव्हाण महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय चौके येथे संस्था अध्यक्ष श्री जगदीश परब यांच्या अध्यक्षतेखाली आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पोळ, स्थानिक समिती अध्यक्ष बिजेंद्र गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे.
चौके हायस्कूल माजी मुख्याध्यापक राजन खोचरे सर सेवानिवृत्ती निरोप समारंभ आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळा उद्या












