खारेपाटण (प्रतिनिधी): कणकवल देवगड व वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार मा. नितेशजी राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आज जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा चिंचवली मधलीवाडी या शाळेत भाजपा खारेपाटण विभागाचे शक्तिकेंद्र प्रमुख सूर्यकांत भालेकर यांच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा नम्रता कोलते उपाध्यक्ष दिनेश पांचाळ, भाजपा कार्यकर्ते योगेश गुरव, साक्षी भालेकर दर्शना गुरव सुरेखा भालेकर यांसह शाळेचे शिक्षक अमोल भंडारी, गोरक्षनाथ गायकवाड, अमोल तुपविहिरे आदी उपस्थित होते. भाजप खारेपाटण विभाग शक्ती केंद्र प्रमुख सूर्यकांत भालेकर यांनी चिंचवली गावातील मधलीवाडी जि.प.शाळा भंडारवाडी जि.प.शाळा तसेच चिंचवली १ नंबर जि.प.शाळा आदी सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. सूर्यकांत भालेकर यांचे शाळेच्या वतीने शिक्षक अमोल भंडारी सर यांनी स्वागत करून शालेय विद्यार्थ्याना आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त खाऊ वाटप केल्याबद्दल भालेकर यांचे आभार व्यक्त केले.
आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचवली मधलीवाडी शाळेत विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप












