आमदार नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
ब्रँडेड कंपनी चे स्मार्ट वॉच देऊन करण्यात आला गौरव
वैभववाडी (प्रतिनिधी): वैभववाडी तालुक्यातील 10 वि आणि 12 वि च्या परीक्षेत तालुक्यात प्रथम 3 क्रमांकाने उत्तीर्ण एकूण 12 विद्यार्थ्यांचा सत्कार जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवि व भाजपा जिल्हा सरचिटणीस मनोज रावराणे यांच्या हस्ते करण्यात आला. माजी नगरसेवक संताजी अरविंद रावराणे यांच्या संकल्पनेतून महाराणा प्रताप कलादालन सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, माजी सभापती अरविंद रावराणे, जिल्हा बँक संचालक समीर सावंत, नगराध्यक्ष नेहा माईणकर, जि. प. सदस्य सुधीर नकाशे, आयोजक संताजी रावराणे, स्नेहलता चोरगे, सीमा नानिवडेकर, प्राची तावडे, सुप्रिया तांबे, यामिनी वळवी, संगीता चव्हाण प्रदीप रावराणे, राजन तांबे, बाबा कोकाटे, उत्तम सुतार, सुभाष रावराणे, समाधान साळुंखे, प्रकाश सावंत, प्रदीप नारकर, प्रदीप जैतापकर, आशिष रावराणे व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मनीष दळवी म्हणाले, गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम संताजी रावराणे हे करत आहेत. आमदार नितेश राणे यांच्यामुळे वैभववाडीला एक वेगळी ओळख निर्माण होत आहे. पर्यटन, रोजगार व रस्ते आदी सुविधा आमदार नितेश राणे यांच्यामुळेच उपलब्ध होत आहेत. वैभववाडीचे भवितव्य यापुढे देखील उज्वल असे आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीसाठी जिल्हा बँक कायम पाठीशी राहील. बँकेकडून शिक्षणासाठी लागणारा कर्ज पुरवठा केला जाईल असे दळवी यांनी सांगितले. यावेळी प्रमोद रावराणे, मनोज रावराणे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच सुत्रसंचालन रज्जब रमदुल यांनी केले तर आभार अरविंद रावराणे यांनी मानले.












