मयुरेश धुरी, श्रावणी पोटघण यांची नवोदय विद्यालयासाठी निवड..!

हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे शाळा आचरा पिरावाडीचे विद्यार्थी

आचरा (प्रतिनिधी ) : हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे शाळा आचरा- पिरावाडी या शाळेचे दोन विद्यार्थी मयुरेश विद्यानंद धुरी आणि श्रावणी गंगाराम पोटघण यांची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. या परीक्षेसाठी एकूण चार विद्यार्थी बसले होते. यशस्वी विद्यार्थ्यांचे शालेय समतीचे अध्यक्ष, सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक सुभाष नाटेकर, सहाय्यक शिक्षक, गावातील ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!