दिनेश गावकर यांची देवगड तालुका युवासेना तालुकाप्रमुखपदी नियुक्ती

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे, युवासेना जिल्हाप्रमुख सुकांत वरुनकर यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्तीपत्र

देवगड (प्रतिनिधी): देवगड येथील शिवसेना कार्यालय येथे पळसे गावातील युवा नेतृत्व दिनेश गावकर यांची देवगड तालुका युवा सेना तालुकाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी इतर पक्ष प्रवेश देखील झाले. शहर प्रमुख देवगड तुषार विजय पेडणेकर, म. आघाडी उपतालुकाप्रमुख स्वप्नाली वाल्मिकी, आघाडी तालुकाप्रमुख शितल सावंत, (जामसंडे) म. आघाडी तालुकाप्रमुख निता गुरव, म. विभाग प्रमुख (कुणकेश्वर) जिल्हा परिषद दिव्या कातवनकर यांनी पक्ष प्रवेश केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, विधानसभा प्रमुख संदेश पटेल, युवा सेना जिल्हाप्रमुख सुकांत वरूनकर, तालुकाप्रमुख अमोल लोके, विभाग प्रमुख पी.टी. पेडणेकर, महिला उपजिल्हाप्रमुख नीलम शिंदे, उपतालुकाप्रमुख (मालवण) भारती घारकर उपस्थित होते.

error: Content is protected !!