जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर तालुका प्रमुख योगेश तुळसकर यांचा पत्रकार परिषदेत इशारा
कुडाळ ( अमोल गोसावी ) : महाराष्ट्र शासनाच्या सिंधुरत्न योजने अंतर्गत कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे – गट पक्षाचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे , शालेय शिक्षणमंत्री श्री. दिपक केसरकर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ईतर राजकीय मंडळी यांच्या माध्यमातून सुमारे 50 कोटीचा निधी आणला गेला आहे. आणि कुडाळ – मालवण चे आमदार वैभव नाईक हे लोकांमध्ये गैरसमज निर्माण करून हा निधी आपणच आणल्याचे जनतेत भासवत आहेत. खोटं बोला पण रेटून बोला असे असे वागत आहेत. वैभव नाईक हे आमदार आहेत ते सध्या सत्तेत नाही आहेत. मुख्यमंत्री शिंदे आणि मंत्री दिपक केसरकर यांनी हा सर्व निधी जिल्ह्याला दिलेला आहे. त्यामुळे आमदार वैभव नाईक यांनी फुक्याचे श्रेय घेऊ नये. असे कुडाळ शिवसेना शाखा कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना बाळासाहेबांची शिवसेना गटाच्या महिला जिल्हा प्रमुख वर्षा कुडाळकर, तालुका प्रमुख योगेश तुळसकर यांनी इशारा दिला आहे. यावेळी कुडाळ महिला तालुका प्रमुख सिद्धी शिरसाट, उप तालुकाप्रमुख अरविंद करलकर,अनघा रांगणेकर आदी उपस्थित होत्या. तसेच नागरी सुविधा ग्रामीण रस्ते विकास अंतर्गतही कोट्यावधी रुपयांचा निधी आणला आहे. मात्र याचे श्रेय आमदर वैभव नाईक व शिवसेना विरोधी पक्ष गट घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या कामांचे श्रेय ईतर कोणीही घेऊ नये. आमच्या कामांची उद्घाटने ही आम्हीच करणार आहोत व प्रत्येक ठिकाणी तसे फलकच लावणार आहोत असा इशारा बाळासाहेबांची शिवसेना गटाचे महिला जिल्हा प्रमुख श्रीम वर्षा कुडाळकर व तालुका प्रमुख योगेश तुळसकर यांनी दिला आहे. बाळासाहेबांची शिवसेना गटाच्या कुडाळ येथील शाखा कार्यालयात पक्षाच्या वतीने करण्यात आलेल्या विकास कामांबाबत माहिती देण्यासाठी शुक्रवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी बोलताना महिला जिल्हा प्रमुख श्रीम वर्षा कुडाळकर म्हणाल्या की, आपल्या पक्षाचे मुख्यमंत्री तसेच दिपक केसरकर व ईतर नेत्यांच्या माध्यमातून सुमारे 50 कोटींचा निधी सिंधू रत्न योजनेअंतर्गत आणण्यात आला आहे. या निधिचे दावेदार आपणच असून हा निधी बाळासाहेबांची शिवसेना व भाजपा युतीच्या माध्यमातून मंजूर करून आणण्यात आला आहे. २५-१५ , डीपीटीसी या माध्यमातून अनेक स्थानिक कामांसाठी विकासनिधी आणला आहे. राज्यात आमची सत्ता आहे, आमच्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत त्यामुळे अनेक कामांसाठी यामाध्यमातून विकासनिधी आपणच आणत आहोत. मात्र काही गावात काही सरपंच आपण निधी आणला असल्याने चुकीचे सांगत आहेत. त्यामुळे या कामांची उद्घाटने आपणच करणार आहोत तसे आता प्रत्येक ठिकाणी आम्ही फलकच लावणार आहोत. आमच्या कामांचे श्रेय ईतर कोणीही घेऊ नये आपण करत असलेल्या विकास कामांमुळे आमची सेना आता वाढत आहे. सर्वांच्या माध्यमातून विकासकामे आपण करत आहोत. यापुढेही भरघोस निधी आणण्याचा आपला उद्देश आहे असे सांगितले. तर तालुका प्रमुख योगेश तुळसकर यांनी सांगितले की, सिंधुरत्न योजने अंतर्गत आपण निधी आणला असताना आम. वैभव नाईक हे या विकास कामांचे श्रेय घेऊन लोकांची फसवणूक करत आहेत. हे अधिकार आपल्या पक्षाच्या नेत्यांना असून त्याचे श्रेय ईतर कोणीही घेऊ नये. आमची सत्ता आमचा मुख्यमंत्री त्यामुळे विकासकामेही आमचीच असणार आहेत त्यामुळे त्यांची उद्घाटने ही आम्हीच करू. डीपीटीसीतही आम्ही जी कामे देऊ ती घेतली जाणार आहेत असे सांगितले.












