विश्वकर्मा सुतार शिल्पकार मंडळ झाराप – कुडाळ आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न

कुडाळ (अमोल गोसावी) : सिंधुदुर्ग जिल्हा श्री विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाज मंडळ झाराप कुडाळ सिंधुदुर्ग आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा मंडळाचे अध्यक्ष श्री. शरद मेस्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दि.9 जुलै 2023 रोजी सकाळी 10 वा. दिमाखात पार पडला. या सोहळ्याचे उद्घाटन झाराप सरपंच दक्षता मेस्त्री यांच्या हस्ते झाले.

यावेळी प्रमुख पाहूण्या म्हणून व्यसन मुक्ती तसेच मधूमेह मुक्ती मार्गदर्शक रिया सुतार व प्रमुख पाहूणे म्हणून प्रसिद्ध उद्योजक सुरेश सुतार,माझी अध्यक्ष आनंद मेस्त्री, मंडळाचे उपाध्यक्ष रितेश सुतार पांचाळ गुरुजी,विजय मेस्त्री,प्रभाकर मेस्त्री, अशोक दाभोलकर मेस्त्री,आदि मान्यवर उपस्थित होते.यावेळी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

हा कार्यक्रम संपन्न व्हावा म्हणून लोकप्रिय आमदार व शिक्षण मंत्री दीपक केसरकर तसेच उद्योजक सुरेश सुतार ह्यांनी भरीव शैक्षणिक साहित्य दिले.त्याचप्रमाणे अन्य दात्यानीही शैक्षणिक साहित्य देत कार्यक्रमाला मदत केली.

दरम्यान माजी अध्यक्ष आनंद मेस्त्री मंडळाचे उपाध्यक्ष रितेश सुतार,क्रीडा समुपदेशक अशोक दाभोळकर,श्रीमती दक्षता पांचाळ रिया सुतार यांनी विद्यार्थ्यांना बहूमोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मंडळाचे सचिव राजन पांचाळ यांनी केले तर आभार अनंत मेस्त्री यांनी मानले.

error: Content is protected !!