सर्व जि प ना कंत्राटी शिक्षक भरतीचे आदेश
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : शिक्षक भरतीला विलंब होणार असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षकांच्या रिक्त पदांवर सेवानिवृत्त शिक्षकांना कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त्या देणार येणार येणार आहेत. त्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना त्याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. अशी माहिती शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी नियोजन समिती सभेत दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य व अनुदानित शाळा १५ जून पासून सुरू झाल्या असून जिल्हा परिषद शाळातील शिक्षकांची पदे आंतर जिल्हा बदलीमुळे मोठ्या प्रमाणात रिक्त झाली आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ हजार हुन अधिक पदे रिक्त आहेत. शिक्षक नसल्याने होणारे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तसेच नियोजित शिक्षक भरती संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने भरती प्रक्रियेस विलंब होत आहे. ही सर्व परिस्थिती विचारात घेऊन पवित्र प्रणाली मार्फत शिक्षक भरती मधून शिक्षक उपलब्ध होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळातील व खाजगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळेतील सेवानिवृत्त शिक्षकांमधून कंत्राटी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात जिल्हा परिषद शाळातील रिक्त शिक्षक पदे अटी शर्तीला अनुसरून भरावित असे आदेश देण्यात आले आहेत.अशी माहिती मंत्री केसरकर यांनी यावेळी दिली. तर शासन आदेशनुसार जिल्हा परिषद प्रशासनाने कार्यवाही सुरु केली असून जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षका कडून १४ जुलै २०२३ पर्यंत अर्ज मागविन्यत आले आहेत. अशी माहिती यावेळी शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांनी दिली.
तसेच कंत्राटी पद्तीने नियुक्त करण्यात येणाऱ्या शिक्षकाची वयोमर्यादा कमाल वयोमर्यादा ७० वर्ष असेल, कोणत्याही इतर लाभाव्यतिरिक्त प्रतिमहा २० हजार मानधन दिले जाईल, शासनाने विहित केलेल्या अटी शर्ती मान्य असल्याबाबत हमीपत्र घेतले जाईल, नियुक्त करण्यात आलेला शिक्षक हा नियमित शिक्षक उपलब्ध होईपर्यंत असेल, तर कंत्राटी तत्त्वावर काम करण्यास इच्छुक सेवानिवृत्त शिक्षकांनी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती यांच्यामार्फत १४ जुलै पर्यंत अर्ज सादर करावयाचे आहेत. प्रशासनाच्या वतीने तसे आवाहन करण्यात आले आहे. अशी माहिती यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांनी दिली.












