सरपंच ॲड.अनघा तेंडोलकर यांनी केली शाळा दुरूस्तीची मागणी
कुडाळ (अमोल गोसावी) : तेंडोली-आवेरे जि. प. शाळेला मागील दोन वर्षे गळती असून ग्रामस्थांच्या सहकार्याने तात्पुरती उपाययोजना करुन मुलांची गैरसोय दूर केली जाते. यातच २०२२ आणि २०२३ या दोन वर्षांपर्यंत शिवसेनेचे अतुल बंगे यांनी मोफत ताडपत्र्या देऊन विद्यार्थ्यांची काळजी घेतली आहे, असे पालकांनी सांगून या भागातून निवडून गेलेल्या जि. प. सदस्यांनी मात्र दुर्लक्ष केला आहे. असा आरोपही पालकांनी केला आहे.
या शाळेची दुरुस्ती जि. प. ने तातडीने करावी अशी मागणी सरपंच अनघा तेंडोलकर यांनी करुन येत्या चार ते पाच महिन्यात या शाळेच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात यावा अशी मागणी कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांच्याकडे सरपंच तेंडोलकर यांनी केली आहे.
आज कुडाळ शिवसेना कार्यालयात शिवसेनेचे अतुल बंगे यांच्याकडून पालकांनी ताडपत्र्या स्विकारल्या. यावेळी कुडाळ तालुका शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक, कुडाळ तालुका शिवसेना संघटक बबन बोभाटे, पिंगुळी शिवसेना विभागप्रमुख गंगाराम सडवेलकर, ग्रामस्थ रतन धुरी, विनायक परब, युवासेनेचे राजू गवंडे, सतीश दुतोंडकर उपस्थित होते.












