वैभववाडी (प्रतिनिधी) : लोरे नं 2 मांजलकरवाडी येथील स्पोर्ट ग्रुपच्या वतीने 10 वीच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा अभिनंदन आणि सत्कार सरपंच विलास नावळे यांच्या उपस्थित त करण्यात आला यावेळी सरपंच विलास नावळे यांनी मनोगत व्यक्त करताना स्पोर्ट्स ग्रूपने केलेल्या कामाचे कौतुक करून यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
स्पोर्ट्स ग्रुपच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे सामाजिक कार्य करत असताना अनेक समजापायोगी कार्य करत असताना विविध स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रम करत तरुणांना प्रोत्साहन देण्याचं काम करत असते.आपल्या गावात मिळालेली कौतुकाची थाप विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात प्रेरणादायी ठरेल असे सरपंच नवाळे म्हणाले.
यावेळी स्पोर्ट्स ग्रूप चे सर्व सदस्य तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक नाना रावराणे, अनिल नरांम, देऊ मांजलकर , विनोद मोरे संतोष मोरे सुभाष कुडतरकर ,संजय सुतार, संतोष शिंदे, बाबू मेस्त्री ,केदार नवाळे,आर्यन मांजलकर ,भाऊ कदम, नारायण म्हाद्ये , चद्रकांत डोंगरे, किशोर घावरे आणि स्पोर्ट्स ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते.












