तन्वीर शिरगावकर यांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी पुरस्काराने सन्मान

कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांच्या हस्ते पुरस्कार वितरण

कणकवली (प्रतिनिधी) : कलमठ येथील न्यू खुशबू मसाले उद्योग स्वयंसहाय्यता बचत गटाच्या अध्यक्षा तन्वीर मुद्स्सरनझर शिरगावकर याना महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने ग्रामपंचायत स्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला व बालविकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या सहीचे प्रमाणपत्र,स्मृतिचिन्ह व रोख रक्कम स्वरूपातील पुरस्कार कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांच्या हस्ते महिला उद्योजिका तन्वीर शिरगावकर यांना प्रदान करण्यात आला. यावेळी कलमठ उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, ग्रामविकास अधिकारी प्रवीण कुडतरकर, ग्रा पं सदस्य नितीन पवार, अनुप वारंग, श्रेयस चिंदरकर तन्वीर शिरगावकर यांच्या बचतगटातील सर्व महिला सदस्या आदी उपस्थित होते. तन्वीर शिरगावकर यांनी महिला बचतगटाच्या माध्यमातून मसाले उद्योगात मोठी झेप घेतली आहे.त्यांच्या न्यू खुशबू मसाले उद्योगाची आणि एकंदरीत महिला विकासाच्या चळवळीची दखल राज्य शासनाने यापूर्वी घेतली आहे.महिला बाळ विकास विभागाच्या वतीने त्यांना राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन सन्मानीत करण्यात आले आहे. महिलांच्या हाताला आर्थिक बळ देण्याचे काम तन्वीर शिरगावकर करत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना राज्य शासनाचा ग्रामपंचायत स्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार आज कलमठ ग्रामपंचायत मध्ये प्रदान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!