श्री रामेश्वर विद्यामंदिर आचरा पिरावाडी प्रशालेत शैक्षणिक साहित्य वाटप…!

सुविद्या एज्युकेशन ट्रस्ट-मुंबई, जयप्रकाश परूळेकर, मुजप्पर मुजावर यांचे दातृत्व

आचरा (प्रतिनिधी) : श्री रामेश्वर विद्यामंदिर आचरा पिरावाडी या प्रशालेच्या कै. वि. स. कुबल सभागृहात ‘विद्यार्थी गुणगौरव सत्कार सोहळा’ काल पार पाडला.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते एस. एस. सी. मार्च २०२३ मधील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

या प्रशाळेतील विद्यार्थ्यांना उद्योजक जयप्रकाश परूळेकर यांचेकडून इयत्ता आठवी, नववी व दहावी मधील प्रवेशीत विद्यार्थ्यांना शालेय ड्रेस वाटप करण्यात आले. ‘सुविद्या एज्युकेशन ट्रस्ट मुंबई’, कै. वसंत दिनकर मेस्त्री यांच्या स्मरणार्थ संचालक प्रकाश मेस्त्री यांचेकडून शालेय विद्यार्थ्यांस छत्र्या वाटप करण्यात आल्यात. तसेच मुजफ्फर मुजावर यांसकडून प्रशाळेसाठी शैक्षणिक साहित्यासाठी रोख रक्कम १०,००० / अशी आर्थिक मदत करण्यात आली.

यावेळी अध्यक्ष म्हणून श्री तरुण संघ दक्षिणवाडाचे अध्यक्ष दिनानाथ धुरी, सचिव मुरलीधर कोळंबकर, प्रमुख पाहूणे म्हणून आचरा येथील उद्योजक जयप्रकाश परूळेकर, आचरा ग्रामपंचायतीचे सदस्य मुजफ्फर मुजावर, शाळा समितीचे चेअरमन डॉ. प्रमोद कोळंबकर, ग्रामोन्नती मंडळ आचरा पिरावाडीचे अध्यक्ष तथा शाळा समिती सदस्य नारायण कुबल, मनोज वाडेकर, पांडुरंग वायंगणकर, प्रशाळेचे प्र. मुख्याध्यापक रणजीत बुगडे व शिक्षक – कर्मचारी वर्ग उपस्थित होते. सुत्रसंचालन बुगडे यांनी तर आभार गोसावी यांनी मानले.

error: Content is protected !!