स्मिता कम्प्युटर एज्युकेशन कट्टा येथे मोफत आरोग्य शिबीर संपन्न

चौके (अमोल गोसावी) : स्मिता कम्प्युटर एज्युकेशन कट्टा MKCL चे मान्यताप्राप्त अधिकृत कम्प्युटर सेंटर तर्फे मुलांच्या आरोग्याची दरवर्षप्रमाणेच या वर्षीही आरोग्य शिबिराचे आयोजन करून तपासणी करण्यात आली, त्यावेळी वरची गुरामवाडी कट्टा सरपंच शेखर पेणकर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून व शिव प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संस्था प्रमुख श्रध्दा नाईक,सुनील नाईक, माजी पंचायत समिती सदस्य विनोद आळवे, साै.भुजबळ आणि सेंटरचे आजी माजी विद्यार्थ्यां वर्ग उपस्थित होते. आरोग्य सेवक श्री गुरखे, आरोग्य सहाय्यीका साै.डामरे, साै.कसालकर, सौ. पाटकर, आरोग्य सेविका, रंजना फाटक लॅब टेक्निशियन, गटप्रर्वर्तक सौ.नाईक,सौ.ढोलंम आशा स्वयंसेविका, साळगावकर मदतनीस यांचे सहाय्य लाभले.

मुलांचे HB, थायरॉईड, कॉलेस्ट्रॉल, शुगर, आणि विशेष म्हणजे तपासणी केलेल्या सर्वांना आभा कार्ड, देण्यात येणार आहेत. यावेळी पूरुष आणि महिलांनीही आपली तपासणी करून घेतली. संस्थेच्यावतीने उपस्थित सर्वांचे भेट वस्तु गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सेंटर कॉर्डीनेटर श्रद्धा नाईक,सुनील नाईक, संस्थेचे कर्मचारी सविता शिरोडकर, ओमकार वराडकर, सानिया पाटकर, आणि सहकारी सानिका बागवे, कोमल फाटक, साक्षी गुराम, रुपाली कुंभार, ट्विंकल परब अश्या अनेक माजी विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

ज्ञानार्जनाचे काम करत असताना असे अनेक उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून कायम होत असतात या बद्दल मान्यवरांनी समाधान व्यक्त केले आणि पुढेही असेच कार्य घडत राहो अश्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांचे सेंटरच्या वतीने आभार श्रद्धा नाईक यांनी मानले.

error: Content is protected !!