नांगरभाट येथील नुकसानग्रस्तांना मनसेचे प्रीतम गावडे यांचा मदतीचा हात

अतिवृष्टीमुळे घरावर माड पडून झालेले घराचे नुकसान

चौके ( अमोल गोसावी ) : मालवण तालुक्यातील नांगरभाट जाधववाडी येथील सुनिता नामदेव जाधव यांच्या घरावर शुक्रवारी पहाटे माड पडून त्यांच्या घराचे मोठे नुकसान झाले. याची माहिती मिळताच मनसेचे युवा नेते तथा युवा उद्योजक प्रीतम विलास गावडे यांनी तात्काळ नुकसानग्रस्त भागाला भेट दिली. यावेळी त्यांनी तातडीची गरज म्हणून स्वखर्चाने प्लास्टिक ताडपत्री देवून मदत केली. यावेळी त्यांच्या समवेत उदय गावडे, प्रकाश सोनवडेकर, राहुल मोंडकर, लौकीक मेहतर, प्रतिक गावडे, ओमकार चव्हाण, रोहन तावडे, तथागत मालवणकर आदी उपस्थित होते. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्याना मदतीची आवश्यकता असल्यास 8605457204 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मालवण तालुका मनसे आणि प्रीतम गावडे मित्रमंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!